
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
राजवर्धन ग्रुप शेटफळ हवेली चे संस्थापक अध्यक्ष व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष माननीय श्री संजय (मामा) शिंदे यांचा वाढदिवस काल शेटफळ हवेली व पंचक्रोशीतील इतरही भागांमध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा न करता शेटफळ हवेली येथे साधेपणाने पण उत्साहात साजरा करण्यात आला. संजय मामा यांची शिस्तबध्दता पाहण्यासारखी आहे, त्याँचा स्वभाव मायाळु , सर्वांना सोबत घेऊन चालणे हा त्यांचा स्वभाव , सर्वांसोबत पारीवारीक सदस्या प्रमाणे वागणे ही त्यांची आवड,हसत बोलण्याने युवक वर्गामध्ये असणारी त्यांची लोकप्रियता यामुळे संजय (मामा) शिंदे यांना मानणारा लोक वर्ग व युवक वर्ग खूप मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी अनेक नेते ,अधिकारी ,कर्मचारी ,पत्रकार मित्र , संजय मामा शिंदे यांना मानणारा युवक वर्ग व मित्र परिवारातुन शुभेच्छा चा वर्षाव व सत्कार करण्यात आला. भावी आयुश्यात अशीच प्रगती होवो अशी कामना केली.
यावेळी शेटफळ हवेली येथील ग्रामस्थ, युवक वर्ग व राजवर्धन ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते .