
दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनिधी -नवनाथ डिगोळे
युवा सेना मा.उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण पेटकर यांनी संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुख श्री बालाजी रेड्डी यांच्या कडे सुपुर्द केला .
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी पाहता शिवसेनेशी गद्दार होऊन आमदारांनी शिवसेनेशी बेइमानी केली आहे.त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.त्याचं अनुषंगाने शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या पाठीशी खंबीर पने उभे राहण्यासाठी व शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब हे अतिशय चांगले काम करत आहेत.साहेबांनी राजीनामा दिला आहे ,आपणास पदाची लालसा नाही , आपण कट्टर शिवसैनिक आहेत.म्हणून चाकुर तालुका संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला असून यापुढे शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब,युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब,लातूर जिल्हा प्रमुख श्री बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वाढीसाठी काम करणार असल्याचे मत लक्ष्मण पेटकर यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे.