
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी-रामेश्वर केरे
धामोरी (खुर्द), लासूर स्टेशन स्तेशन (सावंगी ग्रू ग्रा), दायगाव, माळीवाडगाव, रायपुर, पिंपळगाव, दिवश, वरझडी, किन्हळ, देरहळ, बाभुळगाव, डोनगाव, वैरागड व परिसरातील इतर गावातील रमाई आवास योजनेचे मागील 3-4 महिन्यांपासून आपल्या कार्यालयात प्रलंबीत असलेले प्रस्ताव येत्या 15 दिवसात मंजुर न झाल्यास लाभार्थ्यासह आपल्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार
धामोरी (खुर्द), लासूर स्टेशन स्तेशन (सावंगी ग्रू ग्रा), दायगाव, माळीवाडगाव, रायपुर, पिंपळगाव, दिवश, वरझडी, किन्हळ, देरहळ, बाभुळगाव, डोनगाव, वैरागड, पाडळसा व परिसरातील इतर गावातील रमाई आवास योजनेचे प्रस्ताव मागील 3-4 महिन्यांपासून आपल्या कार्यालयात धूळखात पडलेले आहेत. कार्यालयात प्रस्ताव विनोद झाल्यानंतर पुढील आठ दिवसात सर्व पडताळणी होऊन प्रस्ताव मंजूर होणे अपेक्षित आहे.
एकीकडे सरकार गोरगरिबांसाठी असलेल्या या योजनांची जनजागृती करून या योजनांचा लाभ घेण्याचे आव्हान जनतेला करीत आहे आणि दुसरीकडे शासकीय योजनांचा लाभ देतांना सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांची अशी उदासीनता दिसून येते. यामध्ये लाभार्थी भरडले जात आहेत.
गंगापूर पंचायत समितीने आपल्या कार्यालयात 4 ते 5 महिन्यांपूर्वी दाखल केलेले प्रस्ताव देखील अद्याप प्रलंबीत आहेत. पंधरा दिवसाच्या आत हे प्रस्ताव संपूर्ण पडताळणी करून मंजूर होणे अपेक्षित असताना तीन तीन चार चार महिने का लागतात हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
या पत्राद्वारे आपणास कळविण्यात येते की, धामोरी (खुर्द), लासूर स्टेशन स्तेशन (सावंगी ग्रू ग्रा), दायगाव, माळीवाडगाव, रायपुर, पिंपळगाव, दिवशी,वरझडी, किन्हळ, देरहळ, बाभुळगाव, डोनगाव, वैरागड व परिसरातील इतर गावातील रमाई आवास योजनेचे आपल्या कार्यालयात प्रलंबीत असलेले रमाई आवास योजनेचे प्रस्ताव येत्या 15 दिवसात मंजुर न झाल्यास लाभार्थ्यासह आपल्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार असल्याचे धामोरीचे उपसरपंच रविंद्र चव्हाण यांनी सांगीतले.