
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
उदगीर / प्रतिनिधी
स्वामी विवेकानंद ग्रामसेवा प्रतिष्ठान व्दारा संचलित महात्मा पब्लिक स्कूल उदगीर येथे स्वामी विवेकानंद पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी स्वामी विवेकानंदाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षकांनी स्वामी विवेकानंदाच्या कार्याविषयी विद्यार्थी-विद्यार्थ्यांनीनीना माहिती दिली. यावेळी शाळेच्या संचालिका सौ.संगीता दिपक नेत्रगावे-पाटील, मुख्याध्यापिका सौ.स्मिता तिवारी, तसेच सहशिक्षिका मोनिका सुने, अश्विनी ममदापूरे , शिवकन्या वाघमारे, शिल्पा सांगवे, पांचाळ मावशी यांची उपस्थिती होती.