
दैनिक चालु वार्ता लोहा ( ता प्र) लोहा- भरत पवार
तालुक्यातील गोळेगाव येथील मातंग समाजाच्या स्मशानभुमीवर केलेले अतिक्रमण हटवुन गोळेगाव येथील मातंग समाजाला स्मशानभुमिसाठी जागा तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी यामागणीसाठी आज रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा अध्यक्ष माधवदादा जमदाडे, मराठवाडा उपाध्यक्ष मधुकरराव झगडे, मराठवाडा सदस्य अनिलदादा गायकवाड, वंचितचे नेते के. एच. वन्ने, भारत भालेराव,महिला आघाडी जिल्हध्यक्षा प्रेमीलाताई वाघमारे, शोभाताई इगळे,दक्षीण जिल्हाउपाध्यक्ष प्रदिप भाऊ मगरे,दक्षीण जिल्हाध्यक्ष अॅड. मारोती सोनकांबळे , तालुकाध्यक्ष सुनिल बोईनवाड, यांच्या नेत्तृत्वा खाली तिरडी मोर्चा लोहा तहसिलवर काढण्यात आला. यावेळी मराठवाड अध्यक्ष माधवदादा जमदाडे, मधुकरराव झगडे, मराठवाडा सदस्य अनिलदादा गायकवाड, जिल्हाध्यक्ष मारोती सोनकांबळे, भारत भालेराव यांनी मोर्चाला संबोधीत केले आहे.या मोर्चाला हजारोंच्या संख्येने महीला व पुरुष उपस्थीत होते.