
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर तालुक्यातील मुंबई/नागपूर महामार्गवरील आसेगाव फाटा येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक जण जखमी झाल्याने त्यास लासूर स्टेशन येथील शिवना हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी हालवण्यात आले.
याबाबतची अधिक माहिती अशी कीं सोमवार दिनांक 4 जुलैला मुंबई/नागपूर महामार्गवरील आसेगाव फाटा येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने लासूर स्टेशन येथील सावंगी चौकातील हॉटेल साई बालाजीचे मालक साई मधुकर चव्हाण हे त्यांच्या सँट्रो गाडीनें क्रमांक (MH-17/ N-649)औरंगाबादवरून लासूर स्टेशनकडे रात्री आठ वाजेच्या सुमारास एकटेच गाडी चालवत येत होते मात्र अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते जखमी झाले त्यांना तात्काळ लासूर स्टेशन येथील शिवना हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र धडक दिलेल्या अज्ञात वाहनाने साई चव्हाण यांना जखमी अवस्थेत सोडून धूम ठोकली.
दरम्यान जखमी साई चव्हाण यांना लासूर स्टेशन येथील शिवना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवल्यानंतर अपघातग्रस्त सँट्रो गाडीतून अज्ञात चोरट्यानी बॅटरी, टेप व गाडीत असलेले हॉटेलचे मिक्सर लांबवले असल्याने लोकांच्या मानसिकतेची मात्र कीव येते.