
दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी -आपसिंग पाडवी
वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धन केल्यास भविष्यात आॅक्सीजनची कमतरता जाणवणार नाही यासाठी विद्यार्थांचा व्यापक स्वरूपात वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग अपेक्षित असल्याचे विधानपरिषदेचे आमदार आमश्या दादा पाडवी यांनी बोलतांना सांगितले
सोरापाडा तालुका अक्कलकुवा येथील सावित्रीबाई माध्यमिक विद्यालयात अक्कलकुवा व महाराष्ट्र शासन मेवासी वनविभाग तळोदा वनक्षेत्रपाल अक्कलकुवा वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षदिंडी व
वृक्षारोपण कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते यावेळी विधानपरिषदेचे आमदार आमश्या दादा पाडवी यांच्या हस्ते वृक्षारोपण व सजविलेल्या वृक्षदिंडिचे उद्घाटन करण्यात आले यावेळी बोलतांना आमदार पाडवी यांनी सांगितले की,. वृक्ष हि आपली संपत्ती आहे. प्रत्येकाने वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धन केले तर भावी काळात मुबलक प्रमाणात आक्सीजनची मिळेल तसेच आक्सीजनची टंचाई निर्माण होणार नाही. कोरोना काळात आपणास आक्सीजनचे महत्त्व काय आहे त्याची जाणीव झाली आहे म्हणून आपण जास्तीत जास्त वृक्ष लागवड केली पाहिजे यावेळी अक्कलकुवा तहसीलदार सचिन म्हस्के, लक्ष्मण पाटील उपवनसंरक्षक मेवासी वनविभाग तळोदा,गटविकास अधिकारी महेश पोतदार, प्राचार्या डॉ. संध्या पाटील, एल. डी. गवळी वनक्षेत्रपाल अक्कलकुवा, मनोज रघुवंशी सहाय्यक वनसंरक्षक, सुनील पवार वनरक्षक,कान्हा नाईक, रोहित चौधरी,गोलु चंदेल,रविंद्र गुरव, सांगळे, महाले,धात्रक,आदि उपस्थित होते
कार्यक्रम दरम्यान लाईट ऑफ लाईफ या संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. एम.कलाल यांनी तर आभार प्रदर्शन… यांनी केले