दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:-उदयपूर व अमरावती या ठिकाणी धर्मांध व देशद्रोही लोकांनी हेतुपुरस्पर हिंदू बांधवांची हत्या केलेली आहे . काटगाव तालुका तुळजापूर येथे देखील नामांतराच्या प्रश्नावरून वादंग निर्माण करण्यात आले. या घटनेचा तालुका भाजपच्यावतीने जाहीर निषेध केला आहे. आरोपीवर तात्काळ कठोर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
गुरुवार दिनांक 7 जुलै 2022 रोजी भारतीय जनता पार्टीच्यावतीने भूम तहसील मार्फत मुख्यमंत्री महोदयांना लेखी निवेदन पाठवण्यात आले आहे. या नियोजनात नमूद केले आहे की. उदयपूर व अमरावती या ठिकाणी समाजकंटक यांनी दहशत निर्माण करून हिंदू बांधवांची निर्गमपणे हत्या केली आहे. ही समाजाला काळीमा फासणारी घटना आहे . या घटनेतील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी .तसेच काटगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या ठिकाणी देखील जिल्ह्याच्या नामांतर प्रश्नावरून जाणून बुजून वादग निर्माण करण्यात आले आहे. याही घटनेतील आरोपीवरती तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देताना भा.ज.पा.जेष्ठ नेते बाळासाहेब क्षिरसागर , राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हा कार्यवाहक प्रमोद बाकलीकर , तालुका अध्यक्ष महादेव वडेकर , तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर , शहर अध्यक्ष शंकर खामकर , अनुसूचित जाती जमाती शहर अध्यक्ष प्रदीप साठे , शहर सरचिटणीस हेमंत देशमुख , ता.युवा सरचिटणीस सचिन मस्के ,ता.उपअध्यक्ष बाबासाहेब वीर , संतोष औताडे , लक्षमण भोरे . अमोल लोंढे इ स्वाक्षरी केली आहे .
