
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी -मोहन आखाडे
पेंडेफळ येथे सोसायटी निवडणुकीत निवडून आलेल्या 80 वर्षीय आजीबाईचा प्रा.आमदार रमेश बोरणारे सर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. गेल्या काही दिवसा पुर्वी पेंडेफळ सोसायटीची निवडणूक पार पडली आहे.
विशेष म्हणजे त्या निवडणुकीच्या आखाड्यात ८० वर्षे वयाच्या आजीबाई देखील उतरल्या होत्या त्यांचा देखील दणदणीत विजय मिळवला आहे.
सर्वसाधारण मतदार संघातून इंदुबाई कचरू आहेर या आजींनी १५५ मतदान घेत विजय मिळवला आहे.
. वैजापूर तालुक्याचे आमदार प्रा.रमेश बोरणारे सर यांनी 80 वर्षीय आजी इंदुबाई कचरू आहेर यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला आहे.