
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता,प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर प्रतिनिधी:– डॉ.सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
अहमदपूर
शहरातील सर्वे नंबर ०४ या शासकीय गायरान जागेवरील अतिक्रमण धारकांना कबालनामा मिळण्याचा मार्ग आता खुला झाला असून विभागीय आयुक्त कार्यलय औरंगाबाद यांनी या प्रकरणी लक्ष घालताच कबालनामा तयार करून देण्याबाबतचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांनी दिनांक ०६ जूलै २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला असल्याची माहिती युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी दिली.
या बाबत अधिक माहिती अशी की,गेल्या कित्येक वर्षापासून येथील रहिवाशांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न असून शासकीय जागेवरील अतिक्रमण कायम करून कबाला वाटप करण्याचा प्रश्न सातत्याने चर्चेत होता. यासंदर्भात वेळोवेळी विविध पक्ष,संघटना, लोकप्रतिनिधी यांनी आपापल्या पध्दतीने पाठपुरावा केला होता.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अतिक्रमण नियमानूकूल करण्याच्या जिल्हाधिकारी लातूर यांनी पाठवलेल्या प्रस्तावास राज्याचे संचालक, नगररचना संचालनालय, पूणे यांनी मंजूरी प्रदान केली.
मात्र स्थानीक स्तरावर याची पूढील प्रक्रीया ठप्प होती.दरम्यान या कामाला गती देण्यासाठी येथील लाभार्थ्यांना सोबत घेवून प्रचंड मोठे अंदोलन झाले.तेंव्हा अतिक्रमण नियमानूकूल करणाऱ्या समितीची बैठक उपविभागीय अधिकारी यांनी आयोजित करून या प्रस्तावास मान्यता दिली.
मात्र लाभार्थ्यांकडून कब्जे हक्काची रक्कम वसूल करण्याच्या नोटीसा तहसिल कार्यालयाकडून दिल्या जात नव्हत्या.अशातच तहसिल कार्यालयातून तब्बल दहा दिवस ही संचिकाच गहाळ झाली.शेवटी उपविभागीय अधिकारी कार्यालयातून झेरॉक्स प्रती घेवून नोटीसा देण्याचा प्रस्ताव तहसीलदार यांच्या कडे सादर झाला.पण हा प्रस्ताव झेरॉक्स असून मूळ संचिकेसह प्रस्ताव सादरीकरणाच्या सूचना मिळाल्या.पूढे संचिका गहाळ झाल्या प्रकरणी अंदोलनाचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देताच तहसिल कार्यालयात मूळ संचिका अवतरली.प्रस्तावीत नगर पालीका निवडणूक झाल्या शिवाय येथील नागरिकांना कबालनामे मिळूच नयेत या भावनेने स्थानिक प्रशासन हाताशी धरून कांही राजकीय मंडळींनी शह-काटशह देण्याचा प्रयत्न झाला असल्याचे या बाबत उघड उघड बोलले जात आहे. मूल्यांकन भरण्याच्या नोटीसा देण्यात याव्यात यासाठी तहसिल कार्यालयासमोर पून्हा एकदा सामूहिक पढे अंदोलन केले.शेवटी अंदोलन चालू असतानाच प्रशासनाने लाभार्थ्यांना कब्जे हक्काची शासकीय मूल्यांकन भरण्याच्या नोटीसा वाटप करायला सूरूवात केली.परंतू पून्हा कब्जे हक्काची रक्कम चलनाद्वारे भरायची असल्याने शासकीय चलनच काढून द्यायला संबंधीत प्रशासन तयार नव्हते.या साठी सूध्दा पाठपूरावा करावा लागला.परंतू लाभार्थ्यांना यासाठी वारंवार खेटे घालावे लागले.
शासन निर्णयाप्रमाणे अनूसूचीत जाती/अनूसूचीत जमाती तसेच ५०० चौ.फूट पेक्षा कमी जागा असणार्या लाभार्थ्यांना पैसे भरण्याची आवश्यकता नाही अशा लाभार्थ्यांचा प्रस्ताव शिघ्रातीशीघ्र कबाले तयार करण्यासाठी पाठविने गरजेचे होते मात्र ते पण पाठवण्यास टाळाटाळ झाली.का कोणास ठावूक मात्र हा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्याचा अथक प्रयत्न झाल्याचे स्पष्ट चित्र दिसून येते.स्थानीक प्रशासन सरळसरळ या कामी अडवाअडवी करत असल्याचे दिसत होते. कबालनाम्यावर सही करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावा अन्यथा येथील लाभार्थ्यांना सोबत घेऊन युवक नेते डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली चक्क विभागीय आयुक्त कार्यालय,औरंगाबाद येथे आंदोलनाचा ईशारा दिला.
या नंतर वरिष्ठ पातळीवरून चक्रे फिरली.संबंधित प्रशासन खडबडून जागे झाले आंदोलनापासून परावर्त करण्यासंदर्भात हालचाली झाल्या.तसे पत्र सूध्दा प्रशासनाने दिले.आणी थंड्या बस्त्यात असलेला स.नं.४ कबालनाम्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. तहसीलदार अहमदपूर यांनी दिनांक १/०७/२०२२ रोजी कबालनामे तयार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी अहमदपूर यांच्या कार्यालयाकडे सादर केला. यासंदर्भात डॉ.सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी अतिशय कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी साहेब यांची स्वतः भेट घेऊन हा प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्याबाबत विनंती केली.अखेर दिनांक ७/७/२०२२ रोजी कबालनामा तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
एकूणच गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला कबालनाम्याचा प्रश्न अखेर अंतिम टप्प्यात असून पुढील काही दिवसात संबंधित लाभार्थ्यांना हक्काचा कबलनामा मिळेल आणि त्यानंतर सर्वांसाठी घरे या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत येथील लाभार्थ्यांचा प्रस्ताव भरून घेऊन यासर्व लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्याची प्रक्रिया पालिका स्तरावरून करण्यात येणार असून प्रशासनाने उशीराका होईना प्रस्ताव मंजूरीसाठी पाठविला असल्याने सर्व लाभार्थ्यांच्या वतीने आभार व्यक्त करत असल्याची माहिती या प्रकरणाचा सातत्याने अडथळ्यांची शर्यत पार करत पाठपुरावा करणारे डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी बोलताना सांगितले.