दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज -बाजीराव गायकवाड
शिरशी(बु.):– शिरसी बु.पुनर्वसन येथील जनतेला ३/७/२०२२ पासून पिण्याचे पाण्याची व्यवस्था व गावातील सांडपाणी जाण्यासाठी योग्य विल्हेवाट करावी यासाठी संबंधित कर्मचारी व सरपंच यांना व ग्रामसेवक यांना विचारणा केली असता येथील लाईटची व्यवस्था सुरळीत चालू नसल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही असे उत्तर संबंधित अधिकारी व सरपंच जनतेला देत आहेत व संबंधित लाईट ऑफिस कर्मचारी तर पाऊस चालू आहे आम्ही काय करावे अशी उत्तर देत आहेत.जनतेला सतत अशा उत्तरांना सामोरे जावे लागत आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पिण्याचे पाणी मिळत नाही आणि दूषित पाण्यामुळे संडास उलट्या हे प्रमाण वाढलेले आहे. सिरसी (बु.) पुनर्वसन येथील जनतेला लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी संबंधित ग्रामसेवक सय्यद यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते व्यंकटी जाधव यांनी दुरध्वनी वरून केली आहे.
