
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे
देगलूर: दिनांक 06 या दिवशी मानव विकास कार्यक्रमांतर्गत प्रस्तुत शाळेत वर्ग आठवी ते बारावी च्या एकूण 19 मुलींना सायकलीचे वाटप करण्यात आले.गरजू व होतकरू विद्यार्थ्यांची शाळेत जातांना पायपीट थाबावी.त्याना शाळेला ये-जा करताना गैरसोय होऊ नये म्हणून मानव विकास योजनेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांनींना सायकलीचे वाटप करण्यात येते.शाळेच्या या योजनेबद्दल पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुरेश वनंजे सर , वैद्यकीय अधिकारी शहापूर डॉ. इंगळे सर , विठ्ठल वाघमारे सर, माधव कदम सर , राजेश बामणे,धनाजी पाटील, आनंद दिमलवाड, दिगंबर खिस्से, कविवर्य बालाजी पेटेकर,बालाजी बारडवार, सौ. अंजली देशमुख , दिलीप पाटील, मारोती अंकमवार मामा व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी ,पालक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.