
दैनिक चालू वार्ता मिरज तालुका प्रतिनिधी- पोपट माने
या बैठकीत सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुका निहाय आढावा घेण्यात आला. सांगली जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका मधील बहुतांशी 68 जिल्हा परिषद गट आणि 136 पंचायत समिती गणात शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते निवडणुका लढवणार याबाबत जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची सविस्तर चर्चा करण्यात झाली.
ऊस हंगाम संपला पुढे येणाऱ्या ऊस हंगामात यावर्षीप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना प्रति एकरी ऊस तोडणी साठी 10 हजार, 20 हजार रुपये द्यावे लागू नयेत. तसेच कारखान्याकडून ऊसाला दरही मिळत नाही. मग शेतकऱ्यांना उत्तर प्रदेश आणि गुजरातप्रमाणे दर मिळण्यासाठी महाराष्ट्रातील कारखानदार अनुकूल नाहीत जर दोन कारखान्यामधील हवाई अंतराची अट रद्द झाली तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही प्रति टनाला 5000 रुपये दर मिळेल. महाराष्ट्रामध्ये नव्याने आलेल्या सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटून शेतकरी संघटनेच्या वतीने दोन कारखान्यामधील अंतराची अट काढण्याबद्दल भेट घेऊन सविस्तर निवेदन देणार आहोत.
शेतकरी संघटनेच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिन 9 ऑगस्ट 2022 रोजी पाथरी जिल्हा परभणी येथे दोन साखर कारखान्यामधील अंतराची अट रद्द करण्यासाठी ऊस परिषदेचे आयोजन केले आहे. तरी जिल्ह्यातून सर्व प्रमुख पदाधिकारी शेतकऱ्यांना घेऊन येऊ असे सांगितले.
जिल्ह्यातील महावितरणच्या तक्रारी बद्दल चर्चा करण्यात आली यामध्ये बोगस बिले, वीज चोरीच्या प्रश्नांवर तसेच महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे जळीत झालेल्या ऊसाच्या व इतर नुकसान भरपाई बाबत ही महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आले. शेतकरी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या गावांमधील सर्व विजेचे खांब आणि ट्रांसफार्मर चे भाडे मागणीबाबत अर्ज देणार आहेत .
साखर आयुक्तांच्या आदेशानुसार आर.आर.सी झालेल्या सांगली जिल्ह्यातील कारखान्याकडून शेतकऱ्यांना उसाचे बिल मिळणे बाकी आहे. अशा कारखान्यांच्या ऊस बिल वसुली बाबत जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना भेटून सदर कारखाना मॅनेजमेंटला ही बिले देण्यास शेतकरी संघटना भाग पाडणार आहे.
गोवंश हत्या बंदी कायद्यासंदर्भात शेतकरी संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका आणि त्यावर राज्य सरकारने दिलेले मत, पिक विमा, गुंठेवारी कायद्यासंदर्भात शेतकरी संघटनेने अप्पर सचिव महसूल यांना दिलेले पत्र, नव्याने पिक कर्ज वाटप याबद्दल तसेच बैठकीस आलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी आप आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष श्री.हणमंत पाटील, राज्य कार्यकारणी सदस्य महादेव कोरे, पूर्व सांगली जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील, महिला आघाडी सांगली जिल्हाध्यक्षा वंदनाताई माळी , सांगली जिल्हा सरचिटणीस धनपाल माळी, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेड सांगली जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पवार, सांगली जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव मोहिते, युवा महिला आघाडी अध्यक्षा शर्वरी पवार, माजी जिल्हाध्यक्ष माणिक पाटील काका , कडेगाव तालुका अध्यक्ष परशुराम माळी, मिरज तालुका अध्यक्ष माणिक माळी , मिरज तालुका कार्याध्यक्ष इसाक सौदागर, माजी मिरज तालुका अध्यक्ष अमगोंड पाटील, मिरज शहराध्यक्ष कमलेश्वर कांबळे, वाळवा तालुका युवा आघाडी अध्यक्ष केतन जाधव, विकास माने , सांगली जिल्हा सरचिटणीस प्रदीप कार्वेकर, युवा आघाडी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रतीक कुलकर्णी, पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष विलास कदम, शिवाजी थोरवडे, सयाजी पाटील, महिला आघाडी कोल्हापूर जिल्हा राजलक्ष्मी कुलकर्णी, यशवंत चव्हाण, सर्जेराव देवकर, दादासो कदम , माणिक पाटील, जेष्ठ संघटक जगन्नाथ चिपरीकर, नानासो काणे आदि प्रमुख उपस्थित होते.