
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
निवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
जव्हार:- विक्रमगड तालुक्यातील साखरे येथिल शासकीय निवासी आश्रम शाळेत एका बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवले होते.या धक्कादायक घडलेल्या प्रकरणाने शासकीय आश्रम शाळेतील आदिवासी मुलांचा सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.या घडलेल्या गंभीर घटनेची दखल घेऊन पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण यांनी शासकीय आश्रम शाळेला भेट देऊन घडलेल्या घटनेची माहिती घेऊन पोलिसांना योग्य ती चौकशी करण्याचे आदेश दिले.
सविस्तर वृत्त असे की,शासकीय आदिवासी निवासी आश्रम शाळा साखरे येथील इयत्ता बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.कोविड-१९ च्या जागतिक महामारीच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा आता कुठेतरी सुरू झाल्या होत्या परंतु शाळा सुरू होताच अशा गंभीर घटना घडणे दुर्दैवी असून विद्यार्थ्यांची सुरक्षितता व काळजी घेण्याची गरज आहे.
दरम्यान पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण यांनी संबंधित निवासी आश्रम शाळेला भेट देऊन घडलेल्या घटनेची माहिती घेऊन आश्रम शाळेतील निवासी मुलींशी त्यांनी संवाद साधून भविष्यात शाळेमध्ये विविध विषयांच्या समुपदेशनाची गरज असल्याचे यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले.