
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत इच्छुक उमेदवारांसाठी एक मोठी बातमी समोर आली असून, राज्य निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहेत.
या नगरपरिषद आणि नगरपंचायतसाठी 18 ऑगस्टला रोजी मतदान होणार आहे. तर दुसऱ्या दिवसही म्हणजे 19 ऑगस्टला मतमोजणी होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऐन पावसाळ्यात घेता येणे शक्य नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले होते. तसेत सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये दोन टप्प्यात या निवडणुका घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आयोगाकडून न्यायालयात करण्यात आली होती. मात्र यावर राज्यात ज्या भागात पाऊस नाही, तिथे निवडणुका घेण्यास काय हरकत आहे, असा प्रश्न न्यायालयाने आयोगाला केला होता. त्यानुसार आयोगाकडून जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणूक कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार या निवडणुकीची प्रक्रिया २० जुलैपासून सुरु होणार आहे. २० जुलै रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करणार असून, लगेच २२ ते २८ जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत. छाननी व वैध नामनिर्देशन पत्र असलेल्या उमेदवारांची यादी २९ जुलै रोजी जाहिर केली जाणार असून ४ ऑगस्ट पर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे.
यानंतर जिथे आवश्यकता भासेल तिथे १८ जुलै रोजी मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे यंदा अर्ज माघारी घेतल्यापासून प्रत्यक्ष मतदानापर्यंत १४ दिवसांचा कालावधी असून, प्रचारासाठी उमेदवारांना २ आठवड्यांचा कालावधी मिळणार आहे. यंदा प्रथमच संकेतस्थळावर उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबचा उल्लेख निवडणूक आयोगाने केला असून ती एक नवीन बाब ठरणार आहे.
परंतु, ओबीसी राजकीय आरक्षणाचा तिढा सुटलेला नसून, या निवडणुका ओबीसींच्या आरक्षणाशिवाय पार पडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.