दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- एकनाथ गाडीवान
देगलूर ते उदगीर राष्ट्रीय महामार्गावरील बर्याच दिवसांपासून रस्ता खराब झाल्याने गोजेगाव ते रावी खड्डे बुजविण्याचे काम आठवड्यात पूर्ण करण्यात येणार असल्याचे माहिती भाजपाचे जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी दिली .देगलुर ते उदगीर राष्ट्रीय महामार्गासाठी नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून या रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून निधी मंजूर करण्यात आले.सदर रस्त्याचे काम 3 टप्यात लवकरच करण्यात येणार आहे बऱ्याच दिवसापासून रस्ता दुरूस्त करण्यासाठी कामात विलंब होत आहे त्यामुळे जनतेला खूप ञास सहन करावा लागतो तसेच वाहन चालकांची हाल होत आहेत सर्व समस्यांवर मात करण्यासाठी व जनतेची होणारी गैरसोय टाळण्यासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात
भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी मुंबईत राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता शेलार यांचे प्रत्यक्ष भेट घेऊन देगलूर ते उदगीर राष्ट्रीय महामार्गावरील रावी ते गोजेगाव रस्त्यावर खड्डे प्रमाण खूप वाढल्याने अपघाताचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचल्याने वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज लागत नसल्याने प्रवास करताना व वाहतुकीसाठी ञास सहन करावा लागत आहे या सर्व बाबी लक्षात घेऊन गोजेगावकर यांनी निदर्शनास आणून दिले त्यामुळे खड्डे बुजविण्याचे काम येत्या आठवडाभरात पूर्ण करण्याचे आदेश मुख्य अभियंता शेलार यांनी संबंधितांना दिले. त्यामुळे नागरिकांना खड्ड्याचा ञासातून मुक्तता होणार आहे या वेळी भाजपचे संघटनमंत्री गंगाधरराव जोशी सरचिटणीस शिवराज पाटील होटाळकर उपस्थित होते
