
दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी:-अनंता टोपले
मोखाडा– पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी व बकरी ईद निमित्त गुलाब पुष्प देत शुभेच्छा देण्याच्या मोखाडा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संजय कुमार ब्राह्मणे यांच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने मोखाड्यातील हिंदू मुस्लिम बांधवांना सुखद अनुभूती आणली असून त्यांनी मोखाडा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संजय कुमार ब्राह्मणे यांचे आभार मानले असल्याची माहिती दिनांक 10 जुलै वार रविवार रोजी मिळत आहे.
विशेष म्हणजे मोखाडा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संजय कुमार ब्राह्मणे हे स्वतः पुढाकार घेत प्रत्येकाला शुभेच्छा देत होते. त्यांच्याबरोबर पोलीस उपनिरीक्षक संजय भुसाळ व पोलीस उपनिरीक्षक दुर्गुडे या उपक्रमातील सहभागी होते.यावेळी सामाजिक कामात नेहमी सक्रीय सहभाग घेणारे पालघर जिल्ह्याचे सुप्रसिद्ध सुत्रसंचालक तथा शिक्षक नितिन वामनराव आहेर हे सुध्दा या उपक्रमात सहभागी होत शुभेच्छा देत होते.
हा एक वेगळा व सुखद अनुभव असल्याचे मत उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केले.
यावेळी अगदी पहाटेपासून बंदोबस्त लावण्यात आला असून भर पावसात स्वतः पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे या बंदोबस्तात सहभागी झाले होते. समवेत पी एस आय भुसाळ व दुर्गुडे सुद्धा उपस्थित होते.
भारत हा लोकशाही प्रधान देश असून विविधतेत एकता हे भारतीय समाजाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे व मोखाडावासीय सामाजिक सलोखा राखत गुण्यागोविंदाने सण उत्सव आपसी सलोख्याने साजरा करत असतात.ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण व आनंदाची बाब असून सर्वांनी शांततेत उत्सव साजरा करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करा असे आवाहन यावेळी मोखाडा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांनी मोखाडा तालुक्यातील नागरिकांना केले आहे.पोलिसांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने मोखाडवासीय सुखावले असून हिंदू मुस्लिम बांधवांनी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी संजय कुमार ब्राह्मणे व मोखाडा पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी व पोलिसांचे आभार मानले आहेत.