दैनिक चालु वार्ता कोरपना तालुका प्रतिनिधी -प्रमोद खिरटकर
मुस्लिमांच्या पवित्र सणापैकी एक असलेल्या ईद-अल-अधा (बकरी ईद) रविवारी (ता. १०) मुस्लिम बांधवांतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बिबी येथील मस्जिद आलाहजरत येथे सामूहिक नमाज पठण आणि प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते.बिबी व नांदा आणि परिसरातील विविध मशिदींमध्ये सकाळी ईदच्या नमाजाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच आलाहजरत मस्जिद कमेटी तर्फे सकाळी ९ वाजता सार्वजनिक ईदची नमाज अदा करण्यात आली. पाऊस असूनही मस्जीद मधील झालेल्या नमाजमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. यावेळी बोलताना मौलाना तहसील रजा यांनी बकरी ईद सणाचे महत्व विशद केले. या महिन्यात लाखो भाविक आपल्या इस्लामचे पवित्र स्थान मक्का येथे जाऊन हज यात्रा पूर्ण करतात. या दिवशी कुर्बानी दिली जाते. बिबी गावातही आपण सण शांततेत साजरा केला पाहिजे जेणेकरून इतर समाजातील लोकांना त्रास होणार नाही, असे आवाहन करत गोरगरीब लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी हाक दिली.मस्जीद मध्ये विशेष नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. विशेष प्रार्थनेवेळी आभाळ वृद्धांसह लोक उपस्थित होते. दिवसभर सर्व सोशल मीडियावर देखील ईदच्या सणाच्या शुभेच्छा दिल्या जात होत्या. ईद निमित्त कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सर्व प्रार्थना स्थळांना पोलिस बंदोबस्त पुरविण्यात आला होता. ईद सन शांततेत पार पडला.तसेच बिबी येथील आलाहजरत कमेटीचे अब्बास शेख,सादीक शेख,हबीब शेख,रहीम शेख,अकबर शेख अक्रम शेख, यांनी उपस्थित बांधवांना शुभेच्छा दिल्या.
