
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
उदगीर
प्रधानमंत्री पीक विमा भरण्यासाठी अतनूर तलाठी सज्जा कार्यालयाकडून लागणारी सातबारा व नमुना नंबर आठ अ करिता येथील तलाठी अतिक शेख हे पहिले तलाठी आहेत की, त्यांनी शेतकऱ्यांच्या दारी जावून सर्व कागदपत्रे देणार आहेत.
त्यांनी सार्वजनिक जागा, ग्रामपंचायत सुचना बोर्ड वर लेखी, तोंडी, वॉटसअॕप, फेसबुक, इंस्टाग्राम, नोटीसव्दारे, गावागावातून दंवडी व्दारे सर्व शेतकऱ्यांना सूचित करण्यात येते की मौजे अतनूर, गव्हाण, मेवापूर, चिंचोली, तांडा-वाडी-वस्ती या गावातील पीक विमा करिता ७/१२, ८ अ, वाटप दि.१२, १३, १४ जुलै रोजी मौजे अतनूर येथे होणार आहे. तरी पीक विमा भरण्याची अंतिम मुदत दि.३० जुलै आहे. कोणीही गडबड करू नये ( तारीख वाढू शकते ). तरी सदर दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वाटप सुरू असेल याची सर्वांनी नोंद घ्यावी. असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच अजून ई-पीक पाहणी चे नवीन अप्लिकेशन आलेले नाही. तरी सध्या कोणी पण ई-पीक पाहणी करू नये, ज्यांनी केली असेल, त्यांनी नवीन अप्लिकेशन आल्यावर पुन्हा पीक पाहणी करावी. नवीन अप्लिकेशन लवकरच येईल. असेही तलाठी अतिक शेख यांनी सांगितलं आहे.