
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे: पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणां मधील पाणी साठा कमी झाला होता त्यावेळी पुणे महानगरपालिकेने दिनांक ४ ते ११ जुलै दरम्यान एक दिवसा आड पाणी पुरवठय़ाचे वेळापत्रक जाहीर केले होते.
तद्नंतर १० तारखेला असलेल्या आषाढी एकादशी आणि बकरी ईद विचारात घेता दिनांक ८ ते ११ जुलै पर्यंत दररोज पाणी पुरवठा नियमितपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
आजमितीस चारही धरणां मधील मुबलक पाणी साठा विचारात घेता दिनांक ११ जुलै पासून दिनांक २६ जुलैपर्यंत (दिवसाआड न करता) दररोज पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
दिनांक २६ जुलै नंतर पाणी वाटपा बाबतचा निर्णय त्या वेळेच्या धरणांमधील असलेल्या पाणी साठ्याचा विचार करून घेण्यात येऊन तो कळवण्यात येईल,
याची नागरिकांनी नोंद घ्यावी
अनिरुद्ध पावसकर
मुख्य अभियंता
(पाणीपुरवठा)
पुणे महानगरपालिका