
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- किशोर वाकोडे
बुलडाणा: दि.१०.मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे पोलिसांनी विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह तब्बल ११ व्यक्तीविरोधात लग्नात काही भेटवस्तू दिल्या नाही म्हणून छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.पोलिसात २० वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीत, पती व सासरचे मंडळी काहीही किरकोळ कारणावरून वाद करून शिवीगाळ व मारहाण करत होते. लग्नात काही भेटवस्तू दिल्या नाही असे म्हणून माहेरवरुन कपड्याची शिलाई मशीन व फ्रिज घेण्यासाठी पैसे घेऊन ये, असा तगादा लावत असत. तसेच, तुझी पत्नी सुंदर नाही, तिला काही कामधंदा येत नाही असे पतीस भडकावून देऊन इतर मारहाण करण्यास सांगत होते.
अशा तक्रारीवरून तसेच महिला बालप्रतिबंधक कक्ष यांच्या पत्रावरून धामणगाव बढे पोलिसांनी आरोपी पती फकिरा ऊर्फ अफसर शाह लुकमान शाह (वय २४), सासू सायराबी लुकमान शाह (वय ६०) जाकेरा बी लुकमान शाह (वय ३७), सुलेमानबी फारुकशाह, दस्तगीर मलग शाह (वय ५५), अपशानबी दस्तगीर शाह (वय ५०) फारुक शाह नबीशाह (वय ४०), फिरोज शाह नबीशाह (वय ४५), हमीदाबी नबीशाह (वय ५५). आसमाबी फिरोज शाह (वय ३०) नुरीबी मुसा शाह (वय ३५) सर्व रा. रहिमाबाद ता. सिल्लोड जि. औरंगाबाद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत ममताबादे यांच्या मार्गदर्शनात पोलिस हेडकॉन्स्टेबल सुरेश सोनवणे करीत आहे.