दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
ता. कोरेगाव, करंजखोप येथील येथील सामाजिक कार्यकर्ते उद्धव कर्णे यांच्या वाढदिवसानिमित्त करंजखोप येथे बुधवार 13,जुलै,रोजी, सकाळी 10. वाजता प्राथमिक शाळा येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, विविध रोपांचे वृक्षारोपण, अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप, मान्यवरांच्या उपस्थितीत,करण्यात येणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता अभिष्टचिंतन सत्कार सोहळा कार्यक्रम होणार आहे, या विविध कार्यक्रमासाठी लोकनियुक्त सरपंच लालासो नेवसे, उपसरपंच वैशाली उमेश धुमाळ, प्राचार्य चंद्रकांत( भारत विद्या मंदिर वाघोली व ज्युनिअर कॉलेज) प्राचार्य धायगुडे साहेब( मालोजीराजे हायस्कूल व जुनिअर कॉलेज लोणंद) उद्योजक तानाजीराव सोनवणे, उद्योजक संजय बाबा कर्पे, पत्रकार अरुण जायकर, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद शिरसागर, भरत लोकरे सर, बाळकृष्ण देसाई सर,करंजखोप सेवा सोसायटीचे सर्व पदाधिकारी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी गावातील विविध संस्थांचे आजी,माजी पदाधिकारी, तरुण मंडळ, महिला मंडळ आदि नागरिक ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत,तरी आपण सर्वानी उपस्थित राहावे, असे आवाहन,उद्धव दादा कर्णे मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यांत आले आहे.
