
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- शहरात मुसळधार पाऊस सुरू असतांना विकास हा घरी जात होता मात्र,त्याच्या मित्रांनी त्याला थांबविले.काही वेळातच तिघे दुचाकी वर येवून अल्पवयीन विकास वर चाकूने वार केले.विकासाच्या पोटात तीन ते चार गंभीर घाव करून घटनास्थळावरून आरोपी फरार झाले.विकास हा गंभीर अवस्थेत काही वेळ तेथेच पडून राहिला.शाळेतून घरी जाणाऱ्या मुलांनी त्याच्या आईला ही घटना सांगितली.घटनेची माहिती पोलीसांना मिळताच क्षणी डी.सी.पी. एम.एम.मकानदार,ए.सी.पी. पूनम पाटील सह गाडगे नगर पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले तात्काळ घटनास्थळी दखल झाले.
डी.सी.पी.मकानदार सह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता घटनास्थळापासून नजीक असलेल्या सी.सी.टी.व्ही. फुटेजमद्धे असलेले मारेकरी असावे.परंतु ,फुटेजमधे अस्पष्ट दिसत असल्या कारणाने पोलीसांना तपास करण्यास अडचण निर्माण होत आहे.या खुनी हल्यात गाडगे नगर पोलीसांनी एका संशयीत व्यक्तीला ताब्यात घेतले असून पुढील तपास गाडगे नगर पोलीस करीत आहेत.
माहीती प्राप्तीनुसार,विकास वर याआधी सुध्दा चाकूने गंभीर वार करण्यात आले होते.त्यावेळी विकासाला तात्काळ नागपूर येथे हलविण्यात आले होते.त्याच्यावर योग्यवेळी उपचार केल्याने तो तेव्हा बचावला होता.अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.