
दैनिक चालू वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी-इंद्रसिंग वसावे
ग्रुप ग्राम पंचायत अलिविहीर येथील ग्रामसेवक श्री के. बी. शिरसाठ व सरपंच किसन भामट्या नाईक याची सुरवाती पासून तर आता पर्यतची मालमतेची चौकशी करण्यात यावी ग्रामसेवक हे स्वता ठेकेदारी करून गावात येत नाही व सरपंच सोबत मिलीभगत करून योजनेचा फायदा घेऊन परस्पर लाभ घेत असतात.
ग्रामसेवक हे कधीही ग्रामपंचायती मध्ये येत नाही व ग्रामस्थांना भेटत नाही काही काम असले तर कॉल करावे लागतात व तालुक्याचा ठिकाणी जाऊन सह्या व पेपर तयार करावे लागतात तसेच गावात 8/7/2022 रोजी ग्रामसभा भरवली त्या ठिकाणी ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामसेवकाला प्रश्न विचारले असता उडवा उडवीचे उत्तरे देऊन लोकांना सरपंच कडून धमकी दिली जाते अश्या प्रकारे गावाचा विकास होईल का असा प्रश्न गावकार्यनी उपस्थित केला आहे.
ग्रामसेवक व सरपंच कडे बेहिशोबी मालमत्ता असल्याचे गावकऱ्यांना माहित झाल्यास तक्रार करण्यात आली आहे.
निवेदनावर आदींचा सह्या
अँड मंगेश पाडवी,विश्वराज पाडवी, बलराम पाडवी, महेश वळवी, वसंत पाडवी,अनिल पाडवी, मंगलसिंग पाडवी, विनोद पाडवी, कांतीलाल वळवी, बिपीन पाडवी, इंद्रसिंग पाडवी व गावकरी.