लातूर –
पंतप्रधान खरीप हंगाम २०२२ साठी जिल्ह्यातील अधिसूचित महसूल मंडळामध्ये बाजरी, ज्वारी, सोयाबीन, मूग उडीद, तुर, व कापूस या सात पिकांसाठी विमा योजना लागू असून वीमा भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै असून शेतकऱ्यांनी पिक विमा आपल्या नजीकच्या जिल्हा बँकेच्या शाखेत शेतकऱ्यांनी आपल्या गावात बँकेच्या शाखेत संपर्क साधून गर्दी टाळून पिक विमा भरावा असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने करण्यात आले आहे
पिक विमा सदरची योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकर्यांसाठी असून बिगर कर्जदाराणा वीमा हप्ता भरताना वीमा प्रस्तावसोबत ७/१२ उतारा, ८ अ,स्वयं घोषणापत्र, आधारकार्ड, व बँक पासबुकची छायांकी त प्रत कागदपत्र जोडणे आवश्यक आहे ३१ जुलै ची वाट न बघता आतापासून नजीकच्या जिल्हा बँकेच्या शाखेत संपर्क साधून पिक विमा भरणा करून घ्यावा असे आवाहन जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख व्हॉईस चेअरमन अँड प्रमोद जाधव कार्यकारी संचालक हणमंत जाधव यांनी केले आहे
