
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी- दशरथ आंबेकर
चार-पाच दिवसांपासून संततधार होत असलेल्या जोरदार पावसामुळे येथील शेत जमिनी खरडुन गेल्या आहेत.काल रात्री च्या मुसळधार पावसाने किनवट बोधडी जलधरा शिवनी इस्लापुर व सर्कल मधील शेतजमिनी पुराचे पाणी थेट शेतात घुसल्याने कोंब फुटलेल्या बी भरलेल्या पिकांची प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाणी शेतात गेल्याने फार मोठ्या प्रमाणात नुकसान आहे.तर पाणी धरून राहणारी शेतात पिकांची वाढ थांबली व उभ्या पिकात गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बोधडी थारा भंडारवाडी धानोरा जलधरा शिवनी इस्लापूर परीसरात मुरझळा , भिसी , कोल्हारी , कोसमेट , करंजी , वाळकी , हुडी , लोखंडवाडी , कुपठी , सोनवाडी, झळकवाडी, अप्पारावपेट, कंचली, चिखली, गोडेमहागाव, आंदबोरी, पांगरपाड, मलकजांब, तोंटबा रिटा तांडा रिटा परोटी तांडा परोटी वाळकी सहस्रकुंड इरेगाव रोडानायक तांडा परीसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.त्यामुळे स्थानिक महसूल प्रशासनाने तलाठी व मंडल अधिकारी परीसरात जाऊन शेतीचे पंचनामे करून शासन दरबारी त्यांचे अहवाल पाठवुन शेतकऱ्यांना मदत मिळुन द्यावी अशी परीसरातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे.