
दैनिक चालु वार्ता लोहारा प्रतिनिधी -महेश गोरे
महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा होणारा संस्कृतीक सोहळा आणी धार्मिक परंपरेचा मान हा पालख्यांचा असतो .
आषाढी एकादशी चे औचित्य साधून भोसरी चक्रपाणी वसाहत गणराज कॉलनी क्रं 2 येथील गणराज बालक मंदिर शाळेतील बाल विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन विठ्ठल रुक्मिणी ची वेशभुषा परिधान करून आनंदी वातावरण टाळ मृदंग वीणा च्या व जय नाम घोषात पाल्यांचे व नागरीकांचे लक्ष वेधून घेतले या बाल वारकरी च्या जय राम कृष्ण हरी नाम घोषाने भोसरी परिसर दुमदुमून गेला .
या वेळी उपस्थित गणराज बालक मंदिर संचालिका उषाताई खैरनार व विद्यार्थी पालकांनी उत्साही वातावरणात पालखी सोहळा पार पडला
संचालिका उषाताई खैरनार यांनी आभार प्रदर्शन केले .