
दैनिक चालू वार्ता नांदेड प्रतिनिधी- प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
महाराष्ट्रातील शैक्षणिक दृष्ट्या प्रगतशील असलेले नांदेड शहरातील पीपल्स महाविद्यालय नांदेड हे नाव अपसुकच प्रगतीच्या पहिल्या पानावर पाहावयास मिळते. हे महाविद्यालय स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित असून पीपल्स महाविद्यालय नांदेड मध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत असलेले प्रा. चंद्रकांत गौतम गजभारे यांना समाजशास्त्र विषयात पीएचडी अर्थातच विद्यावाचस्पती ही अति महत्त्वाची पदवी प्रदान करण्यात आली ही पीएचडी पदवी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड नी दिली असून या पदवीमुळे प्रा. चंद्रकांत गौतम गजभारे हे डॉक्टररेट झाले आहेत
प्रा.चंद्रकांत गौतम गजभारे यांनी समाजशास्त्र विषयातील संशोधन पूर्ण करण्यासाठी प्रा.डॉ. कृष्णा शेंडे यांचे मार्गदर्शन घेतले तसेच समाजशास्त्र विषयाचे संशोधन करण्यासाठी सहमार्गदर्शन योगानंद स्वामी महाविद्यालय वसमत येथील प्रा. डॉ. संदीप गोरे यांचेही लाभले. प्रा.चंद्रकांत गौतम गजभारे यांना विद्यावाचस्पती अर्थातच पीएचडी पदवी प्रदान झाल्यामुळे पीपल्स महाविद्यालय नांदेड चे प्राचार्य डॉ.आर.एम.जाधव , उपप्राचार्य डॉक्टर ए.एन. सिद्धेवाड , समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. स्वाती काटे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक तसेच कार्यालयीन कर्मचारी या सर्वांनी प्रा.चंद्रकांत गौतम गजभारे यांचे अभिनंदन केले प्रा.गजभारे यांना पीएचडी अवार्ड मिळाल्यामुळे नांदेड व नांदेड परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करून सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.