
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा-कंधार मतदारसंघात जवळपास आठवडाभरापासून मुसळधार पाऊस होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असल्याच्या पार्श्वभूमीवर लोहा तालुक्यातील लोंढेसांगवी, जोशी सांगवी, किवळा व
ढाकणी या गावातील पूर परिस्थितीची पाहणी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांनी काल मंगळवारी करून पूर परिस्थितीचा आढावा घेतला व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला, या भागातील तेलंगवाडी ते जोशी सांगवी जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरून पाणी जात असल्याने या गावाचा संपर्क तुटला होता या पुलाचीही पाहणी सौ.आशाताई शिंदे यांनी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, मतदारसंघातील पूराने बाधित झालेल्या गावातील शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना ही महसूल विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी आशा ताई शिंदे यांनी दिल्या.किवळा येथील वैरागी महाराजांच्या दर्ग्याला जाणाऱ्या रस्त्यावर पुल नसल्यामुळे या भागातील नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या उपाययोजना तात्काळ करण्याच्या सूचना सौ. आशाताई शिंदे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या, कोणत्याही परिस्थितीत लोहा-कंधार मतदारसंघातील शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शामसुंदर शिंदे शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी असून मतदारसंघातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तथा शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ. आशाताई शिंदे यांनी या भागातील उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना केले, यावेळी शिक्षणाधिकारी येरमे, विस्तार अधिकारी नाईकवाडे, रतन सरजे गुरुजी, अशोक पाटील टर्के, शेकाप वडेपुरी सर्कल अध्यक्ष आनंद देशमुख लोंढे सांगवीकर, विश्वंभर लोंढे, जमीर पठाण, कचरू बंडेवाड सह गावकरी, शेतकरी बांधव उपस्थित होते.