
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा लोंढेसांगवी येथे सततच्या अतिवृष्टीच्या पावसामुळे शाळेच्या वर्ग खोल्याची दुरावस्था झाल्याच्या पार्श्वभूमीवर काल मंगळवार दिनांक 12 जुलै रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांनी भेट देऊन शाळेची पाहणी करून आढावा घेतला, यावेळी सौ.आशाताई शिंदे यांनी सततच्या पावसामुळे शाळेच्या वर्ग खोल्याची दुरावस्था होऊन वर्ग खोल्यात पाणी गळतीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व गैरसोय होऊ नये म्हणून तात्पुरती पर्यायी व्यवस्था करण्याचे यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष आशाताई शिंदे यांनी गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांना सूचना केल्या . लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय ,कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून व जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून लोंढेसांगवी येथील जिल्हा परिषद शाळेला वरखोल्यासाठी निधी उपलब्ध करून शाळा लवकरच दर्जेदार बांधण्यात येणार असल्याची ग्वाही यावेळी सौ.आशाताई शिंदे यांनी उपस्थित गावकऱ्यांना दिली