
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा शहरातील नामांकित असलेल्या कै.विश्वनाथराव नळगे विद्यालयात नुकताच दहावी पास विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा घेण्यात आला.यात अतिशय चांगले गुण घेऊन तालुक्यात नाव कमावलेल्या गुणवत्ता प्राप्त केलेले विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यात शाळेत प्रथम क्रमांक वर्षा फुलपगार 99.80℅ गूण घेऊन उत्तीर्ण झाली, द्वितीय क्रमांक संजना बोरलेपवार 99.60℅ तर तिसरा क्रमांक अथर्व हामदे 99.40℅ व आफरा शेख 99.40℅ गुण पत्रकार रमेश पवार यांचे चिरंजीव रोहन रमेश पवार 93 40,% घेऊन शाळेच नाव लौकिक केलेले आहे.
सदरिल कार्यक्रमात शुभेच्छा देण्यासाठी शाळेचे अध्यक्ष केरबा सावकार बिडवई, उपाध्यक्ष शंकर सावकार उत्तरवार, सचिव अशोकराव चालीकवार, सदस्य नारायणराव चुडावकर, सदस्य लक्ष्मीकांत बिडवई, शशिकांत बिडवई शाळेचे मुख्याध्यापक विलास नागेश्वर सर, अनिल हमदे सर, नरेंद्र चव्हाण सर व विद्यार्थ्यांचे पालक या प्रसंगी उपस्थित होते.