
दैनिक चालु वार्ता वानोळा सर्कल प्रतिनिधी – अजय चव्हाण
मागील आठ दिवसापासून ईस्लापुर, शिवणी,जलधरा, बोधडी , गोकुंदा, मोहपुर , वानोळा , मांडवी , लखमापुर, वाई , व संपूर्ण किनवट-माहूर परिसरामध्ये संततधार पाऊस सुरू आहे.गेल्या सात दिवसापासून सूर्यदर्शनही झाले नाही,सततच्या पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे, संततधार पावसामुळे पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे शेतकऱ्यावर कोसळलेल्या नैसर्गिक संकटामुळे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान होऊन आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असुन बळीरीजा हवालदिल झाला आहे. परिस्थिती लक्षात घेता आमदार भिमराव केराम यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्यापिकाचे पंचनामे प्रशासनाने करून नुकसानीचा अहवाल तातडीने राज्यसरकारकडे पाठविण्याच्या सुचना तालुका प्रशासनास दिल्या आहेत. परिसरातील शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा.चालू खरीप हंगामामध्ये तालुका किनवट माहूर महसूल मंडळात पाऊस सुरू आहे,पावसामुळे असंख्य शेतकऱ्यांची नागरिकांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले असून, आधीच खरीप हंगामामध्ये पावसाच उशिरा आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची संकट ओढवले होते,काही शेतकऱ्यांनी तर पदरमोड करून दुबार पेरणी केली होती,मागील आठवड्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे सध्या पिके चांगल्या स्थितीत होती,परंतु गेल्या पाच दिवसापासून संततधार पाऊस पडत असल्यामुळे पिके पिवळी होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
लहान ओढे,नदीकाठच्या शेतातील पिके पुरामुळे वाहून गेली आहेत त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे, या संकटातून सावरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने आवश्यकता सर्व उपाययोजना करून पुरग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी भाजप नांदेड ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष आदिवासी मोर्चा चे,जितेंन्द्र अ.कुलसंगे यानी केली.