दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
मुंबई.
राज्यांत सत्तांतर होताच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मोठ्या प्रमाणात होण्यांची दाट शक्यता आहे. त्यांची सुरुवात मंगळवारी झाली सनदी अधिकारी श्रीखर परदेशी यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यांत आली परदेशी हे एप्रिल २०१५ पासून पंतप्रधान कार्यालयांत संचालक म्हणून कार्यरत होते गतवर्षी ते एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी विदेशात गेले होते तेथून परतल्यानंतर आता त्यांची नियुक्ती उपमुख्यमंत्री चे सचिव म्हणून करण्यांत आली आहे. आपल्या कार्याचा कार्यभार अधिक गतिमान करण्यासाठी आणि विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पंतप्रधान मोदी यांनी विविध राज्यांतील आयएएस अधिकाऱ्यांच्या एक कोअर गट स्थापन केला होता त्यात परदेशी यांचा समावेश होता. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिंडे यांना मुंबई मेट्रो मुंबईच्या विस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कारभार देण्यांत आला आहे. अश्विनी भिडे यांनी दीर्घकाळ मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनचे वस्थापकीय संचालक पद यशस्वीरित्या सांभाळले आहे. उद्धव ठाकरे सरकारमध्ये त्यांची बदली मुंबई महापालिकेत करण्यांत आली होती आता त्या मुंबई मेट्रोचे वस्थापकीय संचालकपद यशस्वीरित्या सांभाळले आहे. उद्धव ठाकरे सरकारमध्ये त्यांची बदली मुंबई महापालिकेत करण्यांत आली होती. आता त्या मुंबई मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक असलेले एस.आर श्रीनिवास यांच्याकडूंन पदभार स्वीकारतील. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्याधिकारी भाऊसाहेब दांगडे यांची बदली कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यांत आली आहे. तर उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तपदी अजीज शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे ते मुख्य कार्य अधिकारी (गट अ) श्रेणीचे अधिकारी आहेत. यांच्यासह अन्य राज्यांतील जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांच्या बदल्या होण्याची दाट शक्यता आहे
