दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला आहे.येत्या १९ जुलै रोजी शपथविधीचा हा सोहळा रंगणार आहे,अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
१८ जुलै रोजी राष्ट्रपदीपदासाठीची निवडणूक होणार असून त्याच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.शिंदे गटातील शिवसेना आणि भाजपच्या सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाची स्थापना कधी होणार,याच्या प्रतिक्षेत अवघा महाराष्ट्र होता.महाराष्ट्रात मोठ्या नाट्यमय घडामोडींनंतर स्थापन झालेल्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी अनेक आमदारांचे प्रयत्न सुरु आहेत.एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यातही अनेक बैठका झाल्या.त्यामुळे महाराष्ट्रातील खातेवाटप कधी होतंय,कोणतं खातं कुणाला मिळेल,याचे आडाखे बांधले जात होते.अखेर १९ जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होईल,यानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
