
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
नागरिकांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे – वसू महाराज
अमरावती :- जिल्ह्यातील नया अकोला येथे दूषित पाण्यामुळे येथील रहिवासी संचित मानेकर नावाच्या मुलाचा मृत्यू झाला.यावेळेस प्रहारचे फिरते रुग्णालय जिल्हाध्यक्ष छोटू महाराज वसू यांनी मानेकर कुटुंबियांचे सांत्वन केले आणि स्थानिक ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाला बजावून सांगितले.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याकडे वेळेवर लक्ष द्यावे.तसेच स्थानिक प्रशासनाने सुद्धा वेळोवेळी नागरिकांच्या आरोग्याची दखल घ्यायला पाहिजे.गावो-गावी दूषित पाण्यामुळे रोगराई निमंत्रणाला स्थानिक प्रशासनाने योग्य उपाय योजना राबविल्या पाहिजे.असे जिल्हाध्यक्ष छोटू महाराज यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना म्हटले.