दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर (दि.१) : शिंगी येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्थेचे संत तुकाराम माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. भारतमाता प्रतिमेच्या पूजनांनंतर गुरू-शिष्य परंपरेवर आधारित कथा विद्यार्थ्यांने आपल्या भाषणातून मांडल्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रमोद सोनवणे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीमती कल्पना उरणकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु तेजस्विनी साळुंखे हिने केले. यावेळी श्री सुरेश चव्हाण, श्रीमती मंगल जाधव, श्री गजानन हरकळ, श्री गोकुळ काकडे, श्री कैलास बनकर, श्री संदीप सावंत, श्री हरिभाऊ चौधरी यांची उपस्थिती होती.
