
दैनिक चालु वार्ता शिरपूर प्रतिनिधी:- महेंद्र ढिवरे
गुरुपौर्णिमेचे अवचित्य साधून आर सी पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोरखेडा येथे बेलाच्या झाडाचे वृक्षारोपण विद्यालयाचे प्राचार्य श्री आर एफ शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी निसर्ग हा आपला श्रेष्ठ गुरु आहे निसर्ग संवर्धन ही काळाची गरज त्या निसर्गाला संरक्षित ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे निसर्ग सुरक्षित तर आपण सुरक्षित, झाडांच्या गुणांचे वैशिष्ट्य की ते सदैव इतरांना देण्याचे कार्य करतात त्यांच्या आदर्श घेऊन आपणही देशाला समाजाला आवश्यक ती मदत करणे हे आपले कर्तव्य आहे असे विचार प्राचार्य आर एफ शिरसाट सर यांनी मांडले यावेळी विद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी श्री एन वाय बोरसे सर यांनी गुरुपौर्णिमेचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले आई-वडील व आपले गुरुवर्य जे आपल्याला योग्य दिशा देण्याचे कार्य करतात व आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देतात अशा गुरूंना आपण सदैव नमन केले पाहिजे यावेळी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक एन डी चव्हाण, डी आर राजपूत, एस एम पाटील,एस आर देसले, पि टी चौधरी,व्ही एस ईशी, एस जे पाटील, एस एन पाटील,व्ही बी शर्मा किरण कोळी ,काजल राजपूत व विद्यार्थी बहुसंख्येने हजर होते