
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-किशोर वाकोडे
बुलडाणा – दि.१३.भूमिहीनांच्या प्रश्न्नाना वाचा फोडण्यासाठी भूमिहीनांचे अस्तित्वाची जाणीव करण्यासाठी,
भुमीहीनांसाठी अन्यायकारक असलेला महसूल व वनविभागाचा दि . १२ जुलै २०११ चा शासननिर्णय रद्द करावा , सन २०११ पर्यंत शेतीप्रयोजनासाठीचे अतिक्रमणे कायम करण्यासाठी नव्याने शासन निर्णय जाहीर करावा, महसूल व वनविभागाच्या दि . २८ नोव्हेंबर १९९१ च्या शासन निर्णयाप्रमाणे १४ एप्रिल १९९० च्या पुर्वीपासुन अस्तित्वात असलेले शेती अतिक्रमणधारकांचे प्रशासन स्तरावरील प्रकरणे निकाली काढून त्वरीत पट्टे वाटप करावे, वनहक्क कायद्या प्रमाणे दाव्यांची योग्य पडताळणी करुन वनधारकांना पट्टे वाटप करावे , गायरान जमीनीवरील शेती अतिक्रमणधारकांवर ग्रामपंचायतीकडुन होणारा अन्याय थाबंवणे बाबत . या प्रमुख मागण्या घेऊन पत्रकार आम्रपाल वाघमारे, नितीन गवई यांच्या नेतृत्वामध्ये प्रशासनाला जाग येण्यासाठी भूमिहीनांवरील अन्याय थांबण्यासाठी,त्यांचे शोषण थांबण्यासाठी ,माणूस म्हणून जगण्यासाठी ,भूमिहीनाचे अस्तित्व टिकवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा येथे एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारण्यात आले. येणाऱ्या काळत जर शासनाने भूमिहीनाच्या प्रश्नांची जर दखल घेतली नाही तर होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात मुंबई येथे लाखो भूमिहीनांना घेऊन मोर्चा काढण्यात येईल असा इशारा आम्रपाल वाघमारे यांनी दिला आहे .