
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी -मोहन आखाडे
औरंगाबाद शहरातील पाण्याची वाढीव मागणी लक्षात घेता त्यावर तात्काळ उपाययोजना करून हार्सुल तलाव ते हार्सुल फिल्टर प्लांट पर्यंत नवीन जलवाहिनी टाकून आवश्यकतेनुसार एयर व्हाल्व बसवण्यात यावे, हार्सुल फिल्टर प्लांटची पाणी प्रक्रिया क्षमता दहा एम एल डी पर्यंत वाढवणे आणि वाढीव परिणामापैकी चार एम एल डी पाणी हरसुल जेल समोरील ई एस आर मध्ये घेऊन त्याद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, टँकरवर जीपीएस यंत्रणा, बारकोड लावणे, ऑनलाइन पद्धतीने टँकर मागणी आणि पेमेंट भरणा करणे, व्हाल्व ऑपरेशनचा डिजिटल डाटा तयार करणे तसेच व्हाल्व वर जीपीएस सिस्टिम व जीआयएस मॅपिंग करणे,पाणी गळती, पाण्याची चोरी, पाण्याचा अपव्यय, अनाधिकृत नळजोडणी,पाच दिवसाआड वरून चार दिवसाआड पाणी पुरवठा होतो की नाही याची माहिती देण्यात यावी, आदी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून 28 जुलै पर्यंत उपाय योजनाची कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले.
शहरातील वाढीव पाणी प्रश्न संदर्भात महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली स्मार्ट सिटी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी सायंकाळी विविध प्रश्नावर आढावा बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत हार्सुल तलाव ते हरसुल फिल्टर प्लांट पर्यंत नवीन जलवानी टाकून आवश्यकतेनुसार बसवण्यात आले असून हार्सुल जलशुद्धी केंद्र येथे आवश्यकतेनुसार नवीन पंपाची उभारणी करून तेथे 65 व 30 एचपी च्या पंप बसवण्यात येणारअसल्याचे सांगितले. जायकवाडी उद्भव फारोळा शुद्धीकरण केंद्र, नक्षत्र वाडी येथील संतुलन टाकी येथे येणारे व जाणारे पाणी शहरामध्ये किती येते याची मोजमाप करणे त्यामुळे गळती कोठे होत आहे याचा शोध घेता येईल तसेच यासाठी फ्लो मीटर बसून पाणी परिणाम मोजून अभिलेखात नोंद करण्यात यावी, पारोळा येथील ३५० एचपी चा जुना पंप कार्यान्वित करावा त्यामुळे पाण्यात वाढ होऊन शहराला वाढीव पाणी पुरवठा होईल. नहर ए अंबरी येथील झडप खुली केल्यास रोजबागला जास्त पाणी पुरवठा करता येईल. शहरातील ज्या विहिरीवरून खाजगी टँकरवाली पाणीपुरवत आहेत त्या विहिरी अधिग्रहित करून त्या ठिकाणी टँकर पॉईंट तातडीने सुरू करण्यात यावा, खाजगी शिक्षण संस्था, शासकीय संस्था व विद्यापीठ आदी मोठ्या प्रमाणावर पाणी वापर करत होते त्यांचा पाणीपुरवठा 50% वर करण्यात आला. शहरातील सर्व जलकुंभ व उपग्रह तसेच नक्षत्रवाडी येथील संतुलन जलकुंभ हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून नियमाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावे, तेथे नागरिक मित्र पथक व माजी सैनिकांची 24 तास शिफ्ट पद्धतीने नेमणूक करण्यात यावी, जलवान्यावरील गळती बंद करण्यात यावी पाण्याच्या अपव्यय करणाऱ्या नागरिकांना दंड करण्यात यावा, शहरांतर्गत असलेल्या जलवाहिन्यावरील आणि स्लुस व्हॉल्व वरील गळती बंद करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, जलवाहिनीवरील नळाची तपासणी करून अनाधिकृत नळ कनेक्शन शोधणे, पाणी चोरी करणाऱ्या विरुद्ध तसेच अनधिकृत नळ जोडणी करणार्यां व करून देणाऱ्या प्लंबर विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावेत, अनधिकृत नळ जोडणी होणार नाहीत याची दक्षता घेऊन नियोजन करण्याचे निर्देशही प्रशासकांनी दिले. टाईल टू स्टार्ट पद्धतीने टाक्या भरण्याबाबत शक्यता तपासून पाच दिवसाच्या आत अहवाल देण्यात यावा,अकोला पॅटर्न प्रमाणे औरंगाबाद शहर परिसरात भूजल पातळी वाढवण्यासाठी जीएसडीएच्या मदतीने प्रकल्प तयार करण्यात यावा, संपूर्ण पाणीपुरवठ्याचे वॉटर अँड एनर्जी ऑडिट करण्यात यावे, जायकवाडी हेडवर्क येथे अप्रोच चैनल मध्ये कॉफर डॅम तयार करून इमर्जन्सी पंपिंग टेशन मधून पाणी उपसा करून पूर्वी ए सी डब्ल्यू यु सी एल मध्ये कार्यरत असलेले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता सोनकांबळे आणि कार्यकारी अभियंता अजय सिंग यांच्या मदतीने किमान दहा दलली प्रतिदिन पाणी परिणाम वाढवणे करिता युद्ध पातळीवर काम करणे, इंदिरानगर आणि शहरातील ज्या वसाहतीमध्ये दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी सतत येत आहेत त्या ठिकाणी पाणी पुरवठा योजनेचे अंतर्गत नवीन जल वाहिण्यात टाकण्यात याव्यात, मात्र यावेळी असे सांगण्यात आले की पाण्यामध्ये कुठलाही दूषितपणा नाही तरीही नेमका काय प्रॉब्लेम आहे त्याचा शोध घेण्याचे आदेश प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले. जायकवाडी ते औरंगाबाद शहर मुख्य जलवाहिनीवरील विविध गावांना होत असलेल्या पाणीपुरवठ्याचा आढावा घेऊन त्यांना देखील औरंगाबाद शहराप्रमाणे तीन दिवसा आड पाणीपुरवठा करणे बाबत निर्णय घेऊन त्यांच्याकडील थकीत पाणीपट्टी वसूल करण्याचे आदेश ही प्रशासकांनी दिले आहेत. जे प्लंबर महानगरपालिकेची परवानगी न घेता अनाधिकृत नळ कनेक्शन देत असते तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा, शहागंज, जिन्सी, कोटला कॉलनी, क्रांती चौक, एन फाईव्ह सिडको वेदांत जलकुंभ येथे व्हाल्व बदलण्याची कामे हाती घेण्यात यावी त्यामुळे पाण्याची गळती कमी होईल असे निर्देश दिले. पाणीपुरवठा वाहिन्यावरील प्रमुख हॉल्ववर जीपीएस सिस्टीम करण्यात यावी, शासकीय ,निमशासकीय व खाजगी टँकर विना जीपीएस चालू नये, बारकोड लावले आहे की नाही त्याची शहानिशा करावी, असे टँकर आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे आदेशही मनपा प्रशासक पाण्डेय यांनी दिले. कोणते टँकर कुठे भरणार आहे याची पॉईंट फिक्स करण्यात यावे, कोणत्या परिसरातून नागरिकांनी मागणी केली आहे आणि कोणते टँकर कुठे जाणार आहे याची माहिती मिळाली पाहिजे तसेच ऑनलाईन टँकर मागणी आणि ऑनलाइन पेमेंट करण्यात यावे, नागरिकांना घरी बसून ऑनलाईन पाण्याचे पैसे भरता आले पाहिजेत या पद्धतीने व्यवस्था करण्यात यावी असे निर्देश त्यांनी दिले. पाच दिवसा आड वरून चार दिवसाआड पाणी पुरवठा करून त्यात सातत्य कायम ठेवावे जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दखल घ्यावी, शहरात कोणत्या भागात 24 तास पाणीपुरवठा होत आहे त्याचा शोध घेऊन तातडीने माहिती देण्याचे आदेश मनपा प्रशासक पाण्डेय यांनी दिले आहेत. संपूर्ण शहरात नवीन पाणी पुरवठा पाईपलाईन टाकण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला परवानगी देण्यात येत आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेचे डिजिटल नोंद ठेवण्यात यावी, शहरात कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. यासंदर्भात महानगरपालिका शहर अभियंता यांच्या परवानगीशिवाय काम करण्यात येऊ नये, माझं जीवन प्राधिकरणाच्या काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी शहर अभियंता त्यांच्या संपर्कात राहून कामाची गती वाढवावी असे निर्देश प्रशासकांनी दिले आहेत. या बैठकीला महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने, शहर अभियंता एस.डी पानझडे, उपायुक्त डॉ संतोष टेंगळे, उपायुक्त सोमनाथ जाधव, उपायुक्त नंदा गायकवाड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजय सिंग,कार्यकारी अभियंता यांत्रिकी डी. के .पंडित, कार्यकारी अभियंता बी.डी. फड, मनपावैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.पारस मंडलेचा, उप अभियंता किरण धांडे,झोनचे पालक अधिकारी, पाणीपुरवठ्याची सर्वाधिकारी आदी उपस्थित होते.
नागरिकांनी ‘जेलबेल’ ऑप चा वापर करावा
मनपा प्रशासक पाण्डेय यांचे आवाहन
पाणीपुरवठा संदर्भात नागरिकांना योग्य माहिती मिळावी यासाठी महानगरपालिकेने जेल बेल मोबाईल ऑप्लिकेशन (ॲप)तयार करण्यात आले असून तो गुगल प्ले स्टोअर वर जाऊन डाउनलोड करावा त्यामध्ये पाण्यासंदर्भात माहिती मिळणार आहे. आपल्याकडे पाणी कोणत्या वेळेत येणार आहे त्याची माहिती असणार आहे. ज्या भागात चार दिवसाआड पाणी मिळेल तसेच पुढचे पाणी कधी येणार त्याचीही माहिती अप्लिकेशन (ॲप )मध्ये मिळणार असून नागरिकांनी महानगरपालिकेचे जेल बेल ॲप डाऊनलोड करावे असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले आहे.