
दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी -आपसिंग पाडवी
अककलकुवा तालुक्यातील नर्मदा काठावर असलेल्या गमण रस्त्यावर रस्त्याच्या भाग खचुन वाहुन गेल्याने गमणसह,बामणी,सिंदुरी,जांगठी,चिमलखेडी,डनेल या परिसरातील गाव पाड्यावरील नागरिकांना गैरसोयीचे व त्रासदायक होवुन पंधरा ते किलोमीटर पायपीट करावी लागत आहे
अककलकुवा तालुक्यात डोंगर माथ्यावर गेल्या दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगर माथ्यावरील पाणी रस्त्यावर येऊन रस्तांच्या भाग खचुन कोराईपाडा जवळ रस्ताच वाहुन गेल्याने देवबारा देवस्थान जवळ, चिकणीपाडा,कोराईपाडा रस्त्यावर मातीच्या मलबा व ढिगारे पडुन रस्ता बंद पडल्याने
नर्मदा किनारच्या गमण,बामणी,सिंदुरी, डनेल, जांगठी, चिमलखेडी, मोगराबारीपाडा,दोराबारीपाडा,विडीपाडा,पिपलापाडा,पाटीलपाडा डुरापाडा,खालपाडा, हाकडीपाडा, आरावापाडा,बुभापाडा,कोरडीडोंगर,पन्नालपाडा, या गाव पाड्यांवरील नागरीकांना रस्ता बंद पडल्याने गैरसोयीचे व त्रासदायक होवुन पंधरा ते वीस किलोमीटर पायपीट करीत ये जा करावे लागत आहे