
दैनिक चालू वार्ता मोलगी प्रतिनिधी -रविंद्र पाडवी
मोलगी :- अक्कलकुवा तालुक्यातील दूर्गम भागालाही मुसळदार पावसाचा फटका तालुक्यातील पिंपळखुटा फाटा ते गमण दरम्यान वळण रस्त्यावर दरड कोसळली असुन अद्यापही प्रशासनाने दरड बाजुला न केल्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. गेल्या चार ते पाच दिवसापासुन पावसाचा जोर कायम असल्यामुळे डोंगराळ भागात पिंपळखुटा फाटा ते गमण दरड कोसळली आहे. आवलीफाटा,चिखनीपाडा,छापरीउंबर,रोहय्याबारी,कोराई,दराबारी,मोगरीबारी,जांगठी,शेंदुरी,सिपान,मणिबेली त्यामुळे या अनेक मोठी मुख्य गावे मोलगी अक्कलकुवा तालुक्याच्या बाजारपेठ येण्यासाठी याच रस्त्यावर अवलंब करतात मात्र रस्त्यावर दरडी कोसळन वाहतूक ठप्प झाल्याने जेमतेम दुचाकीस्वार वाहने निघु शकतात. अशी परिस्थिति निर्माण झाली आहे संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन या परिसरातील रस्त्यावर कोसळलेली दरड हटवुन या मार्गावरील वाहतूक सुरळीत करणे अपेक्षित होते. मात्र संबंधित विभागाने देखील दूर्लक्ष करीत असल्याने चित्र आहे. प्रशासनाने वेळीच पाहणी करुन दरड हटवून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्याची मागणी परिसरातील नागरिकाकडुन होत आहे.