
दैनिक चालु वार्ता कोरपना तालुका प्रतिनिधीी- प्रमोद खिरटकर
अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूर या वर्षी नवीन उपक्रम करत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढावी या करीता खास करून आदिवासी भागात लक्ष देत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राजुरगुडा येथील १८ विद्यार्थ्यांना आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोल्हापूरगुडा येथील ९ विद्यार्थ्यांना स्कुल बँगचे वितरण करण्यात आले. अल्ट्राटेक चे युनीट हेड यांच्या पत्नी सौ. सुधा श्रीराम यांच्या हस्ते राजुरगुडा येथे स्कूल बँग व नोट बुक वितरण करण्यात आले. या वेळी सीमा देवपुरा, पल्लवी घोष, सी.एस.आर., प्रमुख सतीष मिश्रा, सचिन गोवारदीपे, डॉ. गोदावरी नवलानी, संजय ठाकरे व देविदास मांदाळे यांची उपस्थिती होती. तर कोल्हापुरगुडा येथे आवारपूर चे सरपंच प्रियंका दिवे व उपसरपंच बाळकृष्ण काकडे यांच्या हस्ते स्कूल बँग व नोट बुक वितरण करण्यात आले. दोन्ही शाळेच्या शिक्षणकांची उपस्थिती होती.
यावेळी सर्व मुलांना चिक्की चे वाटप करण्यात आले. व प्रमुख अतीथी सौ. सुधा श्रीराम मँडम यांनी मुलांसी संवाद साधला सर्वांना सुभेच्छा दिल्यात.