
दैनिक चालू वार्ता परतूर प्रतिनिधी-नामदेव तौर
परतूर: वलखेड येथील भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे १४० विद्यार्थ्यांना बुधवारी शैक्षणिक साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी आसाराम सुरुंग, विश्वनाथ सुरुंग, कुंडलिक डव्हारे, बबन येडेकर, लक्ष्मण बिल्हारे, विजय गिरी, तुळशीदास बिल्हारे, शाळेचे मुख्याध्यापक सुभाष खवल, श्रीकांत मायकलवाड, कैलास पाईकराव, प्रेमनाथ झरेकर यांच्यासह भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.