दैनिक चालू वार्ता मरखेल प्रतिनिधी -एकनाथ गाडीवान
देगलुर तालुक्यातील शहापुर व खाणापुर भागातील पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची व गावातील घरांची तसेच पुलांची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याची सुचना मा. उपजिल्हाधिकारी व तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना दिली.
व गावाला जोडणारा जोड रस्ता पावसाच्या प्रवाहामुळे खचुन गेल्याने तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याची सुचना संबंधित अधिकाऱ्यांना दिले. व गावातील विद्युत वाहिनी खंडीत झालेली सुरळीत करण्याची संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी उपस्थित देगलुरचे उपजिल्हाधिकारी सोमय्या शर्मा, तहसिलदार राजाभाऊ कदम, गटविकास अधिकारी शेखर देशमुख, सा.बा.विभाग उपकार्यकारी अभियंता श्रीगीरी, महावितरण उपकार्यकारी अभियंता श्री बनसोडे, जि.प.उपकार्यकारी अभियंता श्री घोडके सर्व प्रमुख पदाधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी, तलाठी ग्रामसेवक कृषी सहायक व गावकरी उपस्थित होते.
