
दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी:-अनंता टोपले
जव्हार: तालुक्यातील कौलाळे ग्रामपंचायत मधिल कुंभारखांड पैकी भगतपाडा येथे अतिवृष्टीमुळे रात्रीच्या सुमारास घराची भिंत धसुन पडली. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मागील सात ते आठ दिवसांपासुन राज्यात मुसळधार पाऊस पडतोय. पालघरमधेही पाऊस सततधार सुरुच आहे. ठिक ठिकाणी नद्यानी रौद्र रूप धारन करून नाले सुद्धा ओसंडुन वाहत आहेत. या अतिवृष्टीचा फटका जव्हार तालुक्याच्या ग्रामिण आदिवासीं कुटूंबांना बसतांना पाहायला मिळतोय. गुरुवार दि. १४ जुलै रोजी कौलाळे ग्रामपंचायत येथील रहीवासी काशिनाथ नाना कलिंगडे याच्या कच्च्या घराची भिंत रात्री ३:०० वाजेच्या सुमारास धसुन पडली व अजुनही काही भाग पडण्याच्या मार्गावर आहे. सद्या पडलेल्या भिंतीला ताडपत्रीचा आधार देण्यात आला आहे. काशिनाथ कलिंगडे यांच्या घरी एकुन १० सदस्य राहतात त्या पैकी एक लहामुल देखील आहे. सदर घटनेची माहीती बहुजन विकास आघाडी अध्यक्ष, झाप ग्रामपंचायत माजी सरपंच तसेच म. ठाकर समाज अध्यक्ष श्री. एकनाथ जी दरोडा व कौलाळे ग्रामपंचायत माजी उप-सरपंच श्री.सुभास मुरथडे यांना मिळताच त्यांनी तात्काळ कलिंगडे कुटूंबीयांच्या घरी जाऊन भेट दिली आणि कलिंगडे कुटूंबाचे सांत्वन केले. या वेळी एकनाथ दरोडा यांनी त्वरीत कौलाळे सजाचे तलाठी तायडे तात्या यांना दुरध्वनी करून घराचा पंचनामा करण्यास सांगितला. तसेच काशिनाथ नाना कलिंगडे यांना पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल सुद्धा मंजुर आहे परंतु ते क्रमवार पद्धतीने देण्यात येते तरी देखील “पुढील ग्रामपंचायत बैठकीत आपण कलिंगडे यांच्या नावास प्राधान्य देऊन ग्रामपंचायत ठराव मंजुर करू”असे देखील दरोडा यांनी आमच्याशी बोलतांना सांगितले.