दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम:- तालुक्यातील गिरवली येथे अटल आनंद घन वृक्ष प्रकल्पाच्या माध्यमातून तब्बल सहा हजार झाडांची लागवड विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग उस्मानाबादचे आर आर चोबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
शनिवार दिनांक 16 जुलै 2022 रोजी गिरवली तालुका भूम येथे सामाजिक वनीकरण विभागा अंतर्गत अटल आनंद घन वृक्ष प्रकल्पाच्या वनविभागाच्या 20 गुंठे क्षेत्रावर 17 प्रकारच्य विविध जातीच्या सुमारे 6000 झाडांची लागवड उस्मानाबाद सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी आर. आर. चोबे यांच्या मार्गदर्शनाखाली व सामाजिक वनपरीक्षेत्र अधिकारी बी. व्ही सदानंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
या झाडांच्या लागवडीचा शुभारंभ भूम परंडाचे युवा नेते विधीज्ञ रणजीत दादा मटे यांच्या हस्ते वडाच्या झाडाची लागवड करून करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस मधुकर मोटे. सरपंच संजय मोटे. वन विभागाचे अधिकारी कांबळे. भरत देवरे. याबरोबरच उपसरपंच प्रकाश आवाड . माजी सरपंच महादेव पुंडे. वृक्षीराज मोटे. बब्रुवान मोटे. अतुल मोटे. आभयसिंह मोटे. जनार्धन निकम. सुचित सातपुते . लोकसेवा हायस्कूलचे मुख्याध्यापक खोसे. पठाण . मेटे. डोके. जिल्हा परिषद शाळा गिरवलीचे मुख्याध्यापक जगदीश चौधरी याचेसह गावकऱ्यांची मोठी उपस्थिती होती.
