दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी:-अनंता टोपले
ठाणे शहर, ठाणे रेल्वे परिसर, ठाणे टी एम टी , बस स्थानक येथे असलेल्या आदिवासी प्रतीक, तारपा ,याची त्वरित दुरूस्ती करावी, किंवा नव्याने बसवावे, आदिवासी चित्रकला नव्याने काढावी, आमची आदिवासी चित्रकार मोफत काढून देतील असा इशारा सामाजिक कार्यकर्ते आप मोहन गुहे सर यांनी केला आहे, आदिवासी समाज घटक बांधव यांच्या कडे दुर्लक्ष केले जाते,त्याच प्रमाणे आदिवासी प्रतीक असलेल्या तारप्याची डागडूजी करायला हवी, ठाणे जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर,आवारात तारपा धारी वादकाचा पुतळा आहे त्याचेही सुशोभीकरण करून तारपा दुरुस्त करन पुतळा चौथरा बांधून उंचा वर बसवावा आदिवासीच प्रतीक असलेला हा पुतळा इतर अन्य पुतळ्या प्रमाणे चौथऱ्यावर बसवावा व आदिवासी तारपा वादक स्मारक असे नामकरण कराव.
