
दैनिक चालू वार्ता.प्रतिनिधी -संभाजी गोसावी
अहमदनगर जि. पारनेर तालुक्यांतील लोणी हवेली गावचे सुपुत्र शहीद जवान रामचंद्र लहु साठे वर्षीय ३० या वीर जवानाला जम्मू-काश्मीर येथे देशसेवा बजावत असताना वीरगती प्राप्त झाल्यांने अहमदनगर जिल्ह्यांसह पारनेर तालुक्यांमध्ये शोककाळ पसरली. शहीद जवान रामचंद्र साठे यांचे पार्थिव शनिवारी सकाळी पारनेर तालुक्यांत दाखल झाल्यानंतर अंतदर्शनासाठी तालुकाभरांतून नागरिकांनी गर्दी केली होती. लोणी हवेली गावात त्यांना शासकीय तमामांत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यांत आले शहीद जवान साठे यांचे पार्थिव सकाळी ९ वाजता पारनेर शहरांमध्ये दाखल झाले असता.आमदार निलेश लंके व नगराध्यक्ष विजय औटी या वीर जवानांच्या पार्थिवांचे अंत्यदर्शन घेत आदजंली वाहिली. पारनेर शहरात भव्य मिरवणुकीच्या माध्यमातून त्यांना कीर्ती म्हणून त्यांना देण्यात आली अमर रहे अमर रहे भारत माता की जय वंदे मातरम जय जवान जय किसान अशा घोषणांनी पारनेर शहर व लोणी हवेली रस्ता दुमदुमून गेला होता. सुभेदार मोहन निलजकर यांच्यासह १३ जवान तसेच पोलिसांनी या वीर जवान साठे यांना मानवंदना दिली. यावेळी आमदार निलेश लंके, तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, कृषी बांधकाम समितीचे माजी सभापती काशिनाथ दाते, नगरपंचायतीचे नगराध्यक्ष विजय औटी, उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, गटविकास अधिकारी किशोर माने, दीपक लंके कॅप्टन विठ्ठलराव वराळ, यांच्यासह विविध क्षेत्रांतील राजकीय शैक्षणिक सामाजिक तसेच लोणी हवेली गावचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटील यांच्यासह गावांतील मित्रपरिवार माता बहिणी ज्येष्ठ नागरिक व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने अंत्यसंस्कारावेळी उपस्थिंत होते. शहीद जवान रामचंद्र लहु साठे यांच्या पश्चांत आई-वडील पत्नी व दीड वर्षाचा मुलगा व तीन महिन्यांची मुलगी असा त्यांचा परिवार होता. सन २०१३ मध्ये साठी हे सैन्य दलात भरती झाले होते नाशिक तसेच जम्मू काश्मीर येथे सैन्य दलांत त्यांनी नुकतीच ९ वर्ष सेवा बजावली होती. त्यांचे माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद लोणी हवेली येथे झाले तर महाविद्यालयीन शिक्षण लोणेश्वर विद्यालयांत झाले महाविद्यालयीन शिक्षण पारनेर येथे झाले नाशिक येथे सैन्य दलांत भरती होऊन सध्या ते जम्मू काश्मीर येथे मराठा रेजीमेंटमध्ये २०३ अटलरी येथे कर्तव्यांवर असताना त्यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्या जाण्यांमुळे साठे परिवारांसह संपूर्ण पारनेर तालुक्यांतून हळहळ व्यक्त होत आहे.