
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी – अनिल पाटणकर
वडील रिक्षाचालक तर आई गृहिणी असलेल्या प्रियांकावर शुभेच्छांचा वर्षाव
—————————————————————————————————-
धनकवडी – कोणतेही स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रचंड इच्चाशक्ती आणि जिद्दीला आपल्या प्रामाणिक कष्टाची जोड दिल्यास आकाशालाही गवसणी घालता येते याचाच प्रत्यय नुकताच धनकवडीतील प्रियांका चंदनशिव या विध्यार्थीनीनी आपल्या कर्तुत्वाने दाखवून दिला आहे.तिने घरची परिस्थिती नाजूक असतानादेखील आपल्या जिद्दीला अभ्यासाची जोड देत संपूर्ण देशात अवघड समजल्या जाणाऱ्या सीए (सनदी लेखापाल) ची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उतीर्ण होण्याची किमया केली आहे त्यामुळे तिच्यावर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मुळचे भोर तालुक्यातील किवत या गावचे रहिवासी असलेले गुलाब चंदनशिव परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी पुण्यात आले व धनकवडीत स्थायिक झाले त्यासोबतच त्यांनी उपजीविकेचे साधन म्हणून रिक्षा व्यवसाय निवडला त्यातून होणाऱ्या अर्थप्राप्तीवरच आजही ते आपला परिवार चालवित आहेत . पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे प्रियांका ही त्यांची लहान मुलगी.तिचे प्राथमिक शिक्षण धनकवडीतील बाल विकास शाळेत तर माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण भोर येथील राजा रघुनाथराव विद्यालयात मराठी माध्यमातून झाले. स्वत: सुशिक्षित असलेल्या गुलाब चंदनशिव यांनी आपल्या नाजूक परिस्थितीची सबब न सांगता परिवाराच्या उदरनिर्वाहासोबतच मुलांचा शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले त्यामुळेच मोठी मुलगी इंजिनियर आणि लहान मुलगी सीए (सनदी लेखापाल) झाली असून मुलगा महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. पहिल्यापासूनच अभ्यासात हुशार असणाऱ्या प्रियांकाला सीए होण्याची मनोमन ईछा होती आणि तेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन रोज आठ ते दहा तास अभ्यासाचे योग्य नियोजन करून तिने हे अभूतपूर्व यश संपादन केले आहे. यावेळी बोलताना प्रियांकाने सांगितले कि , “मला हे यश मिळविण्यासाठी माझे आई,वडील आणि कुटुंबियांकडून नेहमीच सकारात्मक पाठींबा मिळाला तर सर्व शिक्षक आणि मित्र परिवाराकडून योग्य असे मार्गदर्शन मिळाले त्यांचे मी आभार व्यक्त करते या सर्वामुळेच मी पहिल्या प्रयत्नामध्ये एवढी अवघड परीक्षा उतीर्ण झाले”