
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी:- दशरथ आंबेकर
तालुक्यात सलग सात दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.अतिवृष्टीच्या पावसाने मौजे ईरेगाव येथील ग्रामस्थांच्या घराचे प्रचंड नुकसान झालेआहे.गावातील अनेक घरांची पडझड झालीआहे.यामुळे शासनाचे प्रतिनिधी म्हणून गावचे सरपंच सौ. रत्नमालाअमोल गोरे,ग्रामसेविका सौ.एम.टि.मिपुंलवाड मॅडम यांनी आपली जबाबदारी पार पाडत गावातील नुकसानग्रस्त ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन पाहणी केली.आपत्तीग्रस्त ग्रामस्थांना झालेल्या नुकसानीची नोंद करून त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या लाभासाठी पुरपडीचीग्रस्त लोकांची पुढीलप्रमाणे यादी तयार करून शासनाला पाठविण्यातआली.यामध्ये गणपत आंकुलवाड,सुभाष आकुंलवाड, प्रमेश्वर खोकले,संतोष मिराशे,शंकर पोशष्टी मांगीरवाड,मारोती मागीरवाड गणेशआकुलवाड,दत्ता गोरे,रामा मांगीरवाड,यांची नावे तयार करून पाठविलीआहे.अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झालेल्याआपत्तीग्रस्त ग्रामस्थांना धीर देत,त्यांनी शासन दरबारी आपल्या समस्या मांडून लवकरच शासकीय मदत मिळवून देऊ असे आश्वासन ग्रामसेविका सौ.एम.टी.मिपुंलवाड मॅडम व सरपंच, उपसरपंचानी दिले.यावेळी ग्राम पंचायत सदस्यअमोल गोरे,देवराव मेटकर,बालाजी मिराशे,मारोती उतुरवाड,आनंदा मिराशे,पत्रकार दशरथआंबेकरसह गावातील महिला,पुरुष बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.शासन पुरपडी मदतीची घोषणा कधी करणार?आहे.हेअद्याप जिल्हा महसूल प्रशासन नांदेड यांनी कळविले नाही.